कंटेंट डिझाईन घोषणापत्र

ह्या दस्तऐवजाची उपयुक्तता 

आम्ही प्रत्येक व्यक्तीला हे समजण्यासाठी मदत करू इच्छितो की, कंटेंट डिझाईन म्हणजे काय, आम्ही कसे काम करतो, आमच्या कामाचा काय प्रभाव आहे आणि आमच्या भविष्यातील काय योजना आहेत. आम्ही अशी आशा करतो, ह्या माहितीचा फायदा कंटेंट डिजायनर, आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्था आणि जे आपल्या उत्पादनाचा (प्रॉडक्ट) वापर करतात अश्या सर्वांना अधिकाधिक सफलता मिळविण्यासाठी होईल.

आमची ओळख काय

आम्ही कंटेंट डिजायनर आहोत, उपयोगकर्ता अनुभव (UX) डिझाईन प्रक्रियेचे ओनर (owner). आमचे काम अशा अनुभवांना डिझाईन करणे आहे कि जे त्याचा वापर करणाऱ्या लोकांसाठी अधिक सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण असेल. अर्थपूर्ण सुस्पष्टता आपल्या संस्थेचा व्यावसायिक प्रभाव वाढवते.

आमचे कौशल्य आणि दृष्टिकोन अद्वितीय आहे आणि हीच अद्वितीयता आमच्या टीम ला हे निश्चित करण्यासाठी सक्षम बनवते कि UX कंटेंट अचूक असेल, पुढील पाऊल टाकण्यासाठी योग्य असेल आणि प्रत्येक व्यक्तीला समाविष्ट करेल (inclusive) – कुठेही, कसेही आणि जेव्हाही त्यांना याची आवश्यकता असेल तेव्हा.

आमची कार्यपद्धती

आम्ही अनुभव डिझाईनच्या अनेक शाखांपैकी  एक म्हणून काम करतो. आकडे, संशोधन, कार्यनीती, व्यावसायिक उद्देश्य आणि मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास आमच्या कामाला अधिक समृद्ध करतो.

आम्‍ही उत्‍पादन क्षेत्रांमध्‍ये सर्वसमावेशक रुंदी, खोली आणि व्याप्तीसह कार्य करतो. आम्ही ग्राहकांशी संलग्न राहतो आणि आमचे सहकारी, जे इंजीनीरिंग, संशोधन, उत्पादन व्यवस्थापन, डिझाईन, कायदा, मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि कार्यकारी भूमिका इत्यादि सेवांमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या सहयोगाने काम करतो.

आम्ही काय जाणतो

  1. कंटेंट मौल्यवान आहे. अनुभव तयार करण्यासाठी कुठल्याही संस्थेला UX कंटेंट अनिवार्य आहे. कंटेंट डिजायनर एंगेजमेंट, कन्वर्शन, अभिग्रहण (adoption), धारणा (retention), समाधान, ब्रॅंड बद्दल आत्मीयता आणि इतर अनेक मापदंडाना प्रभावित करून संस्थेचा खर्च कमी करतात आणि त्यांचे उत्पन्न वाढवतात. कंटेंट डिजायनर जोखीम कमी करतात, गुणवत्तेची खात्री देतात, प्रवेशयोग्यता (accessibility) आणि समावेश (inclusion) वाढवतात, शोध सक्षम करतात आणि लोकांच्या भावनांना प्रभावित करतात.
  2. कंटेंट डिझाईन म्हणजे फक्त शब्दांकन नाही. आम्ही सर्व प्रणाली  डिझाईन करतो, जेणेकरून हे सुनिश्चित होते की कंटेंट सुसंगत (cohesive), नैतिक आणि उच्च गुणवत्तेचे असून लोकं कसे विचार करतात ते प्रतिबिंबित करते. आम्ही ब्रॅंड वॉइस, कंटेंट डिझाईन प्रणाली, वैचारिक मॉडेल, शासकीय प्रक्रिया, कंटेंट केंद्रित संशोधन आणि शब्दावली यासारखे अनेक गोष्टी बनवतो.
  3. चांगले आकडे कंटेंट डिझाईन अधिक सक्षम बनवतात. कंटेंट डिझाईन साठी समाज, त्याची गरज आणि व्यवसाहिक संधी यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.इतर अनेक डिझाईन क्षेत्राप्रमाणेच कंटेंट डिझाईन आकड्यांच्या पुनरावृत्ती (iteration) बरोबर अधिक प्रभावी होते.
  4. तपशील (detail) महत्वपूर्ण आहे. आम्ही कंटेंट आणि त्याच्या प्रत्येक मुद्याचा सूक्ष्म अभ्यास करतो कारण ते उपभोगकर्त्यांच्या प्रॉडक्ट अनुभवासाठी महत्वाचे आहे.
  5. भाषेला सहजता देणारी साधने कंटेंट डिझाईनरला सक्षम बनवतात. आम्ही मोठे भाषा मॉडेल्स, शब्दलेखन आणि व्याकरण तपासक आणि अशा अनेक साधनांचा उपयोग करतो. ही साधने आम्हाला भारी आणि पुनरावृत्तीक कार्याबरोबर धोरणात्मक (strategic ) कामावर लक्ष केंद्रित करायला मदत करतात.
  6. जे शब्द आशयपूर्ण नसतात ते UX मधील कमतरता दर्शवतात. जेव्हा शब्द योग्य आशय मांडू शकत नाहीत तेव्हा कंटेंट डिझाईनर महत्वाचे प्रश्न विचारतात, संशोधन करतात आणि डिझाईन व उत्पादन कार्यनीती मधील कमतरता दूर करण्यासाठी डिझाईनची पुनरावृत्ती करतात.
  7. कंटेंट डिझाईन उत्पादन संकल्पना ते उत्पादन प्रक्षेपणापर्यंत काम करते. आमचे मूल्य आमच्या विचारांची खोली आणि गुणवत्ता या मध्ये आहे. जेव्हा डिझाईन प्रक्रियेमधे सुरुवातीपासून आमचा सहभाग असतो आणि काम करण्यास पुरेसा वेळ दिल जातो तेव्हा तुम्ही आमच्याकडून जास्तीतजास्तं लाभाची अपेक्षा करू शकता.
  8. आमचा समुदाय सर्वसमावेशक (inclusive) आहे. आम्ही कंटेंट डिजायनर ना काम, मार्गदर्शन, प्रयोजन, आणि शिक्षण देतो जेणेकरून आमचा समुदाय जगाला प्रतिबिंबित करेल आणि त्याची सेवा करेल.

आमच्या वाटचालीची दिशा कोणती आहे

आपली सत्यता लक्षात ठेऊन जिथे आम्ही ह्या क्षेत्राला पुढील काही वर्षांत घेऊन नेऊ इच्छितो तिथेपुढे दिलेल्या काही बाबी निश्चितपणे असतील. कुठल्याही एकट्या कंटेंट डिजायनरच्या थेट नियंत्रणात यापैकी काही गोष्टी असतील किंवा कुठल्याच गोष्टी नसतील पण एक समुदायाच्या स्वरूपात आपले प्रकल्प, नियोक्ते आणि प्राधान्यक्रम निवडून ह्या क्षेत्राला एक नवीन दिशेला नेण्यास आपण प्रभावित करू शकतो.

  1. कंटेंट डिझाईनर, इन-हाऊस आणि फ्री-लान्स, यांना समान मेहनताना मिळेल. आमचे कौशल्य आणि आमच्या स्वामित्वाची व्याप्ती, उत्पादन डिझाईनर आणि UX संशोधनकर्ते यांच्या बरोबरीची आहे, फक्त आमचे आउटपुट वेगळे असेल. बऱ्याच संस्थांनी UX संबंधित सर्व भूमिकांना (roles) समान मेहनताना देण्यास सुरुवात केली आहे.
  2. कंटेंट डिझाईनर उत्पादन डिझाईन योजनांचे प्रकल्प चालवतील. धोरणात्मक डिझाईनचे नेतृत्व करणे एक कौशल्य आहे, जे आमच्या सहयोगी उत्पादन डिझाईनर आणि UX संशोधनकर्ते यांच्या बरोबरीने आमच्यामध्ये आहे, ज्याला आमचे भाषेवरील प्रभुत्व अधिक समृद्ध करते. काही प्रकल्प दृश्य-प्रथम (visual-first) असल्याने तर काही कंटेंट-प्रथम असल्याने यशस्वी होतात; सर्वात योग्य व्यावसायिक पुढाकार घेतील.
  3. कंटेंट डिझाईन व्यवस्थापक कार्यशील नेतृत्वाच्या स्वरूपात पुढे येतील. टीमचे नेतृत्व आणि व्यवस्थापन हे एक असे कौशल्य आहे जे सहयोगी उत्पादन डिझाईनर आणि UX संशोधनकर्ता यांच्या बरोबरीने आमच्यामध्ये आहे आणि आमचे भाषेवरील प्रभुत्व त्याला अधिक समृद्ध करते.
  4. कंटेंट डिझाईनर धोरणात्मक आणि उच्च-प्रभावी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतील. त्याच्या कॉस्मेटिक महत्वापलीकडे जाऊन कंटेंट डिझाईनला UX ची पायाभूत गोष्ट मानले जाते. कंटेंट डिझाईनर मौल्यवान धोरणात्मक UX व्यावसाईकांप्रमाणे काम करतात.
  5. कंटेंट डिझाईनच्या पेशाप्रती लोकांची पोच वाढेल. जे त्यांच्या करियरची सुरुवात करू इच्छितात किंवा पेशा बदलू इच्छितात, त्यांना आम्ही प्राथमिक संधि उपलब्ध करून देतो, उपयुक्त पद उपलब्ध करून देतो. आम्ही विश्वासार्ह संसाधने आणि प्रमाणपत्र कार्यक्रम वाढविण्यासाठी काम करतो.
  6. आम्ही डिजिटल कंटेंटचे कार्बन फुटप्रिंट कमी करू. आम्ही उत्पादन उपयोगकर्तांच्या गरजा आणि ग्राहवारील आमच्या प्रभावामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. आमचे काम अशा प्रयत्नांमध्ये योगदान देते जे टिकाउपणा वाढवते आणि हानी कमी करतात.

या घोषणापत्राबद्दल माहिती (इंग्रजी मध्ये)

स्वाक्षऱ्या

स्वाक्षर्‍या वेगळ्या पानावर हलवल्या गेल्या आहेत कारण लांबलचक याद्या हे पान वापरण्यास कठीण करत होत्या.

शेवटचे अपडेट 23 जून, 2023 रोजी केले गेले आहे.

भाषांतर – श्रुतीका ढाके आणि समिधा कलगुटकर.